
प्रेरणाभूमी – लवकरच ऑनलाईन उपलब्ध...
संपूर्ण मनमाडला प्रेरणा देण्यासाठी, काहीतरी खास तुमच्यासाठी तयार करत आहोत.
प्रेरणा भूमी आढावा – वारसा ते चळवळ
मनमाड येथील ऐतिहासिक "प्रेरणाभूमी" बद्दल सखोल माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आहे.

समानतेची, शिक्षणाची आणि संघर्षाची स्मृती
प्रेरणाभूमी – मनमाड' हे एक ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे स्थळ आहे, हिची उभारणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या दूरदृष्टीतून आणि दिवंगत आर. आर. पवार यांच्या अथक परिश्रमातून झाली.
या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वसतिगृहाचे
👉 भूमिपूजन – ९ डिसेंबर १९४५
👉 उद्घाटन – १७ नोव्हेंबर १९५१
या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र हस्ते झाले.
आजही ही वास्तू अनेक आठवणी, चळवळीचे इतिहास आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणा अंगी बाळगून उभी आहे. ही केवळ वास्तू नसून शिक्षण, समता आणि प्रगतीचे प्रतीक आहे.




उद्दिष्टे
१. डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम वसतिगृह या वास्तूला "प्रेरणाभूमी" म्हणून जाहीर करणे
२. ही वास्तू “प्रेरणाभूमी” म्हणून जाहीर व्हावी
३. राष्ट्रीय स्मारक व शैक्षणिक केंद्र उभारणे
४. १७ नोव्हेंबर – प्रेरणादिन म्हणून साजरा करणे
५. नव्या पिढीला या इतिहासाची माहिती पोहचवणे
६. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे
आजही ही वास्तू जीर्ण अवस्थेत उभी आहे...
पण ही केवळ इमारत नाही – ही प्रेरणाभूमी आहे! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, शिक्षणाच्या ज्योतीची, आणि परिवर्तनाच्या संघर्षाची साक्ष आहे ही जागा!