समाजासाठी प्रेरणा – सर्वांसाठी विकास, निःस्वार्थ भावना हेच आमचे बळ...

मनमाडच्या डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला "प्रेरणाभूमी"चा दर्जा मिळणार?

मा. रवींद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक संतोष आहिरे, समाजसेवक विलास कटारे, संजय निकम, दीपक साळवे, सुनील साळवे यांची शिष्टमंडळाची मुंबईत भेट

बातमी

by - Prernabhoomi Social Media Committee

9/23/20251 मिनिटे वाचा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र स्थळी वास्तव्य केले, ज्या स्थळांना आपल्या उपस्थितीचा स्पर्श झाला, ती स्थळं आज समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहेत. त्यापैकीच एक असलेला मनमाड येथील डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम लवकरच "प्रेरणाभूमी" म्हणून घोषित होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

शिष्टमंडळाची मुंबईत भेट

मनमाड येथील माजी नगराध्यक्ष रवींद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक संतोष आहिरे, समाजसेवक विलास कटारे, संजय निकम, दीपक साळवे, सुनील साळवे यांचा शिष्टमंडळाने राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली.
या वेळी आश्रमाला "प्रेरणाभूमी" घोषित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

चर्चेत मनमाड आश्रमाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा, येथे आंतरराष्ट्रीय ज्ञान संकुल उभारणे, तसेच १७ नोव्हेंबरला "प्रेरणादिन" म्हणून राजकीय मान्यता देणे अशा महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा झाली.
अण्णा बनसोडे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी मनमाड येथे प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले. या दौऱ्यात शासकीय अधिकारी, प्रेरणाभूमी विकास कृती समिती आणि व्यवस्थापन प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे.

आंदोलनाची दखल

काही आठवड्यांपूर्वी प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या वतीने मनमाडमध्ये झालेल्या भव्य आंदोलनाला मोठे जनसमर्थन मिळाले होते. याच आंदोलनाची दखल शासनाने घेतल्याचे या भेटीत स्पष्ट झाले.

शिष्टमंडळाची प्रतिक्रिया

बैठकीनंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की,
"डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेली ही भूमी लवकरच प्रेरणाभूमी म्हणून घोषित होईल, असा आम्हाला विश्वास आहे. या निर्णयामुळे मनमाड शहराच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळेल."